महायोगी स्वामी उमानंद सरस्वती, ह्या आध्यात्मिक प्रांतातील उच्चतम अधिकारी , प्रगल्भ सिद्धहस्त लेखिका आणि कवयित्री होत्या. स्वामींनी स्वानुभूतीने आध्यात्मिक मार्गदर्शन खालील ग्रंथांद्वारे केलेले आहे .
महायोगी स्वामी उमानंद सरस्वती लिखित ग्रंथसूची इंग्लिशमधील ग्रंथ
:
१) श्री ज्ञानेश्वरी ऍज अंडरस्टूड -खंड १ ते ३
ज्ञानेश्वरी हा संत ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेला भगवद्गीतेवरील प्रसिद्ध व पवित्र विवेचनात्मक ग्रंथ . श्री ज्ञानेश्वरीतील प्रत्येक ओवीचे स्वानुभवाने केलेले नवीन अर्थपूर्ण विवेचन ,शहाणपणाने ओतप्रोत भरलेले सुंदर विचार ,सरळ सुबोध ओघवत्या शैलीत लिहिलेला हा रसाळ ग्रंथ प्रत्येक आधुनिक अभ्यासकाने अभ्यासलाच पाहिजे.
२)श्रीगुरुगीतार्थेश्वरी
गुरुभक्तियोग साध्य होण्यास श्री गुरुगीता साहाय्यभूत ठरते. श्रीगुरुगीता हा गुरुभक्तियोगाचा ग्रंथराज आहे. गुरुभाव निर्माण करण्याचे महान सामर्थ्य श्रीगुरुगीतेत आहे. श्रीगुरुगीता हा श्रीशंकर, जगाचा गुरु आणि पार्वती ,जगन्माता या दोघांमधील संवाद आहे .श्रीशंकर, या ग्रंथात पार्वतीला मुक्तीचा मार्ग सांगतात. श्लोकरूपातील श्रीगुरुगीता मूळ संस्कृत भाषेत आहे. त्यावरचा हा स्वानुभवावर आधारित विवेचनात्मक ग्रंथ आहे .
महायोगी स्वामी उमानंद सरस्वती लिखित ग्रंथसूची
मराठीतील ग्रंथ:
१) . श्री गुरुचरित्र बोधेश्वरी खंड १ ते ७
प्रसिध्द व पवित्र अशा श्रीगुरुचरित्र या धार्मिक ग्रंथाचे पारायण करण्यास सर्वांना अनुमती नाही. त्यावर निर्बंध आहेत .हे लक्षात घेऊन स्वामी उमानंदांनी महिलावर्गासह सामान्य जनांच्या कल्याणासाठी हा विवेचनात्मक ग्रंथ लिहिला .या ग्रंथाच्या वाचनाने श्रीगुरुचरित्राच्या पारायणाचेच फळ मिळेल असे स्वामी उमानंदांनी सांगितले आहे .
२) श्रीगुरुगीतार्थेश्वरी
गुरुभक्तियोग साध्य होण्यास श्री गुरुगीता साहाय्यभूत ठरते. श्रीगुरुगीता हा गुरुभक्तियोगाचा ग्रंथराज आहे. गुरुभाव निर्माण करण्याचे महान सामर्थ्य श्रीगुरुगीतेत आहे. श्रीगुरुगीता हा श्रीशंकर, जगाचा गुरु आणि पार्वती ,जगन्माता या दोघांमधील संवाद आहे .श्रीशंकर, या ग्रंथात पार्वतीला मुक्तीचा मार्ग सांगतात. श्लोकरूपातील श्रीगुरुगीता मूळ संस्कृत भाषेत आहे. त्यावरचा हा स्वानुभवावर आधारित विवेचनात्मक ग्रंथ आहे .
३).सिद्धांतेश्वरी
अध्यात्मातील सिद्धांत
४) .श्रीगुरुचरित्र सिद्धांतेश्वरी
श्रीगुरुचरित्र यातील सिद्धान्त
६)श्री गुरुगीता पठणेश्वरी
श्रीगुरुगीतेतील संस्कृत श्लोकांचे ओवीबद्ध मराठी भाषांतर
७).श्रीमुक्तेश्वरी
गुरुदेव मुक्तानंदबाबांनी हिंदीमध्ये लिहिलेल्या गद्य मुक्तेश्वरीचे गुरुआज्ञेने केलेले मराठीतील ओवीबद्ध भाषांतर. ह्यात गुरुभक्तीयोगासंबधी साधकास केलेला उपदेश आहे.
७) गुरु पादुका अर्चना अर्थात् गुरु स्मरणेश्वरी
गुरुस्मरणाचे साधक जीवनातील महत्व आणि फायदे
८) श श्रीगुरु महिमानेश्वरी आणि श्रीगुरुमानसपूजनेश्वरी
गुरुगुणगानाचे साधक जीवनातील महत्व यात सांगितले आहे.
आणि असंख्य अप्रकाशित ग्रंथ.
काही इतर प्रकाशने :
१) महायोगी स्वामी उमानंद सरस्वती चरित्र व कार्य (मराठी )
या पुस्तकात महायोगी स्वामी उमानंद सरस्वतींच्या जीवनकार्यासोबत महासमाधीनंतरच्या कार्यासंबंधी माहिती आहे.
२) श्री कुसुमेश्वरी सोव्हिनिअर (इंग्लिश)
स्वामींच्या ६० व्या वाढदिवसानिमित्त गुरुभक्तांनी लिहिलेले लेख
३)श्री कुंडलेश्वरीचा विवाह
कुंडलिनी योगाची ओळख करून देणारा ग्रंथ.
४) स्वामी उमानंद विशेषांक (मराठी )
स्वामींच्या संन्यासदीक्षेनंतर ६२ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने छापलेला विशेषांक .
५) लीला लहरी
भगवान नित्यानंदबाबा व गुरुदेव मुक्तानंदबाबा यांची काव्यात्मक स्तुती (मराठी)