स्वसुखाचा विचार मनांतहीं न येणाराच गुरुभक्त. गुरुची आज्ञाकांटेकोरपणे, स्वतःचे मत व मन बाजूला सारून पाळणे हीच गुरुसेवा. गुरुच्या मता प्रमाणे वागले कीं गुरुचें मन सांभाळले जातेच. स्वतःच्या मनाचे ओझे मनावर ठेवणारा गुरुकार्यात यशस्वी होत नाहीं गुरुवर भार घालून त्याच्या मार्गदर्शनाखालीच गुरुचें कार्य करावे. -- श्री गुरुचरित्र बोधेश्वरी


Audio Gallery




Siddhayog


24 Feb 2019


English Marathi

Siddhayog


This is a set of 17 audio discourses in Marathi

H. H. Muktananda Baba was on his 3rd world tour when he sent message to H.H.Swami Umanand from the U. S. to give discourses on the subject of Siddhayoga to lead her group of seekers on the Siddha path. Thus, these discourses on the topics ranging from ‘Why Siddhayoga’.? to Initiation on the path, to the most important spiritual practice in Siddhayoga ‘Gurucharana seva’.

Other relevant topics are ‘Many spiritual practices in Siddhayoga, Meditation, Service to Guru, One-pointed devotion to Guru, and any other spiritual practices as advised by Guru from time to time. The root of all practices in Siddhayoga is Guru’s Grace. So, topics like Japayoga, Right diet for siddha sadhakas, Getting up early in the morning to do sadhana and Importance of spiritual knowledge.

These topics help seekers to understand the path and continue with their progress upon the path.


NOTE: The complete collection can be purchased from Gurudev Dhaynmandir, Andheri

Siddhayog


सिद्धयोग: या विषयाच्या एकूण १७ ध्वनिफित आहेत.

या ध्वनिफितींमध्ये सिद्धयोग कशासाठी? इथपासून ते सिद्धयोगाच्या विद्यार्थ्यांना करावी लागणारी ध्यान आणि ज्ञानसाधना, त्यासाठी पाळावी लागणारी आचार संहिता, साधनेसाठीचा ब्राम्हमुर्हत गुरूमुखी साधनेचे महत्व, ध्यानयोगाचे रहस्य. जगन्माता कुंडलेश्वरी, सिद्धविद्यार्थ्यांचा आहार, अभिचारी भक्ती, शिवयोग, गुरूसेवा, अंतरसमज, सिद्धविद्यार्थ्यांच्या सर्व क्रियांच्या मुळात असणारा गुरू, त्या गुरूवरच ध्यान, त्याकरीता करावा लागणारा शक्तीपात म्हणजे गुरूने द्यावी लागणारी दीक्षा व जपयोगासारखे दिव्य साधन तसेच गुरूचणांच्या सेवेचे महत्व इतके सर्व विषय यामध्ये सामावलेले असल्यामुळे नवीन आलेल्या साधकाला या ध्वनिफितीच्या श्रवणांतून सिद्धयोगाविषयीची परिपूर्ण माहिती मिळते व आपल्या साधनेची सुरवात कुठपासून करायची ते आपल्याला कुठपर्यंत जायचे आहे याचे त्याला सम्यक ज्ञान होते. व त्यामुळे त्या विषयीचे भान राहण्यास मदत होते. म्हणून नवीन साधकांनी श्रवणाची सुरवात सिद्धयोगाच्याच ध्वनिफितीपासून करावी.

NOTE: संपूर्ण संग्रह गुरुदेव ध्यानमंदिर, अंधेरी येथून खरेदी करता येईल



Official Site of Mahayogi Swami Umanand Saraswati © Shree Gurudev Dhyan Mandir Trust & Shree Kusumeshwari Prakashan    Site Designed By Raminde.in