Strong ego or insolent pride is due to ignorance of Guru. This ego asserts it self because it is ignorant about Him and the self. -- souvenir, 1979


Article

पिंडे मुक्ता पदे मुक्ता
रूपे मुक्ता वरानने
(साक्षात्काराच्या अवस्था)
पिंडे मुक्ता पदे मुक्ता, रूपे मुक्ता वरानने।
रूपातीते तु ये मुक्तास्ते मुक्ता नात्र संशयः ॥१२२॥


ज्याची कुंडलिनी शक्ति जागृत झाली आहे, ज्याचा हं स: मंत्राक्षरांत प्राण स्थिर झाला आहे व ज्याला आत्मज्योतीचे नील बिंदूंत दर्शन झाले आहे व जो निरंजन, निराकार, निर्विकल्प स्थितीत आहे, तोच मुक्त ह्यांत संशय नाही. कुंडल म्हणजे वेटोळे घालून असलेली साडेतीन वेढे असलेली दिव्य शक्ति. प्रत्येक व्यक्तीत मूलाधारांत पाठीच्या कण्याच्या खाली असते. तिला दोन मुखे असून एक बाहेरच्या जगांत इंद्रियभोगांत प्रवृत्त करते व दुसरे निवृत्त मार्गानि सर्व देह व्याप्त करण्यासाठी, मस्तकापर्यंत पोहोचण्यासाठी ऊर्ध्वगामी होण्यास गुरूच्या साहाय्याची अपेक्षा करून असते. गरुकृपेने साधक प्रवृत्तीचा निवृत्तिदास होतो व ज्ञानमार्गे आत्मसाक्षात्काराच्या मार्गास लागतो. पिंडातून मुक्त झाल्याची खूण म्हणजे कुंडलिनी जागृति. मी देह ही भावना मग जाते. मी तोच, हं स: हा सोऽहम् मंत्रच श्वासोच्छ्वासातून ध्यानांत विवक्षित अवस्थेत ऐकू येतो म्हणून हं सः मंत्राक्षरांत प्राण स्थिर होणे म्हणजे पदमुक्ति. नील बिंदु हेच वास्तविक गुरूचे निवासस्थान, तुरीया अवस्था होय. जागृति, स्वप्न, सुषुप्तीनंतरची चवथी अवस्था सविकल्प समाधि, जींत जग व जगदीश दोन्ही दिसतात. ह्या तुरीया अवस्थेपर्यंत ध्यान पोहोचणे म्हणजे नामरूपाच्या जगतापासून मुक्तता होणे. अशा ध्यानाचा परिपक्व परिणाम म्हणून साधक नंतर निरंजन, निराकार स्थिती प्राप्त करून घेतो; म्हणजे देह, नाम ह्यांच्या वर्चस्वांतून सर्वस्वी सुटतो, उपाधिरहित होतो. त्याच्या सर्व संकल्पांचा नाश होतो. दृष्टीसमोरील सृष्टि अजिबात नाहींशी होते. सर्वत्र प्रकाशाचा अफाट, अपार समुद्र पसरतो. त्यात त्याचे अस्तित्व, भान लोपून बुडून जाते. उन्मनी ध्यानाच्या ह्या निर्विकल्प समाधीपर्यंत साधक जाऊन पोहोचतो. तेथे ना रूप, ना नाम, ना व्यक्ति, ना सृष्टि. फक्त चिती शक्तिचाच विलास चाललेला असतो. असा अनुभव आलेल्यालाच निःसंशय मुक्त म्हणायचे. स्वात्मप्रकाशच सर्वांच्यांत व सर्व विश्वांत अंतर्बाह्य सर्वत्र व्यापून असलेल्याची प्रत्यक्ष अनुभूति म्हणजेच निर्विकल्प समाधि. तुरीया अवस्थेत स्थिर झालेला व्यवहार व दर्शन दोन्ही एकाच वेळी करीत असतो तर उन्मनी अवस्थेची स्थिरता झाल्यावर ती सहज समाधि होऊन हवे तेव्हा व्यवहारासाठी तुरिया अवस्थेत येता येते व केव्हाही निर्विकल्प समाधीत विश्रांतीही घेता येते. समाधि म्हणजे काष्ठवत् देह, निरुपयोगी जीवन नव्हे. तर खरी परिपक्व पूर्ण समाधि म्हणजे पूर्ण समाधानाने सहज जीवन जगणे; प्रकाशांतून सुखाने वाटचाल करणे, अंधारांतले चाचपडत कष्टी जीवन पूर्णतया संपते. सूर्याप्रमाणे सर्व जगावर आत्मप्रकाश पसरवीत, चंद्राप्रमाणे सर्व जीवांना शीतलता देत, मेघाप्रमाणे सर्वांवर प्रेमाची वृष्टि करीत, आनंदाची कुबेरसंपत्ति सर्वत्र लुटत, असा समाधीयुक्त अवघाची संसार सुखाचा करून आनंदाने तिन्ही लोक भरून टाकतो. जीवन्मुक्त होऊन विदेही मुक्ति पण ह्याची देही साधतो.


10 Nov 2024
जनी सर्व सूखी असा कोण आहे।
विचारे गुरुभक्तमना तूंची शोधुनि पाहे ॥
गुरुभक्तमना त्वांचि रे पूर्व संचीत केले।
तया सारिखे भोगणें प्राप्त झालें ॥

जग अपूर्ण, लोक अपूर्ण, मग पूर्ण सुखी तरी कोणी आढळेल का? सुखाची सारी माध्यमे अपूर्ण, अपुरी आहेत. फक्त गुरुच पूर्णता पावलेला. गुरुव्दाराच पूर्ण सुख शांती लाभु शकतात. असा विचार करशील व जगांत पूर्ण सूखी शोधायला जाशील तर हे गुरुभक्त मना तुला गुरुखेरीज पूर्ण सुख निधान कोठेही गवसणार नाहीं हे पक्के समज. पूर्ण सूखाचा शोध घेतांना अखेर तुला हाच बोध होईल. जसे ज्याचें पूर्व कर्म तसे बरे वाईट भोग त्याच्या वाट्यास येतात. कर्माचा हा कायदा अटळ आहे. पण गुरुभक्त मात्र गुरुभक्तीने माफीचे कूळ होऊ शकतो. गुरुकृपेने त्याचे प्रारब्ध बदलू शकते, पुढील जन्मींच्या आयुष्यातील आयुष्य देखील गुरुआज्ञेनें ब्रम्हदेव बहाल करु शकतो. श्रीगुरुचरित्र याला प्रमाण आहे. एवढें गुरुचें महात्म्य असतांना गुरुभक्त मना. गुरुचरण सोडुन तूं कोठेही रमुं नकोस. जात्याच्या खुट्यापासचे दाणे चरडले जात नाहीत. जात्याच्या गुरुभक्ताचें नुकसान करणारी एकही गोष्ट वा व्यको परिस्थित बाहेरच्या जगात नाही हे विसरु नकोस.

--गुरुमुक्तानंद स्तवनेश्वरी आणि गुरुभाक्त्मानस बोधेश्वरी
श्रुति-स्मृती अविज्ञाय..

श्रुतिस्मृति न जाणताही वेदान्ताचा अभ्यास न करणारे पण केवळ गुरुसेवा करणारेही, संन्यासी ह्या संज्ञेला पात्र होतात. पण गुरुकृपाहीन जरी वेदान्ती असला तरी तो केवळ वेषधारी, नामधारीच समजला पाहिजे, तो बोकेसंन्यासीच ठरणार. गुरुकृपा म्हणजे कुंडलिनीजागृति, संन्यासयोगाची किती सोपी युक्ति हा श्लोक सांगत आहे! आजच्या धामधुमीच्या काळी श्रुतिस्मृतिपारंगत व्हायला कोणाला फुरसत आहे? तेवढी ताकदही कोणात आहे? दीर्घायुष्य तरी कितीजणांना लाभते? अशा जीवांना उद्धाराचा, त्यांना पेलणारा मार्ग हा श्लोक सांगत आहे. गुरुसेवा ही केवढी महान आहे! गुरुसेवक केवळ गुरुसेवेने संन्यासयोगी होऊ शकतो. उलट वेदान्ती केवढाही महान आचार्य असो, पण जर त्याचा गुरू ह्या संस्थेवर विश्वास नसेल, गुरुशिष्य परंपरा तो मानीत नसेल, तो गुरुकृपाहीन असेल तर तो संन्यासपदापर्यंत पोहोचू शकत नाही. स्वत:ला संन्यासी म्हणविणारे पण गुरुकृपेस पात्र ठरलेले नसतील तर ते वेषधारी संन्यासीच समजावेत. खरा संन्यासी व बोकेसंन्यासी ह्यातला फरक सामान्य माणसाला कळत नाही व म्हणून वेषधारी संन्यासी गृहस्थी जनांना सतावतात, भेडसावतात व लुबाडतात. पण हा श्लोक खरा संन्यासी कसा ओळखावा ते स्पष्ट करीत आहे. गुरुकृपा झालेला तोच संन्यासी व त्याला दारोदार भीक मागत हिंडावे लागत नाही. गुरुकृपेने त्याला कधीही काही कमी पडत नाही. संन्यासी हा याचक नसतो, भिकारी वा भिक्षेकरी भिक्षूकही नसतो, तो दाता असतो. पूर्वी संन्यासी भिक्षा मागायला पाच घरे जात, ते संसारी जनांचे आशीर्वादाने भले करायला, स्वत:च्या पोटाची खळगी भरायला नव्हे. रामदासांसारखे समर्थ संन्यासी बसल्याजागी हजारोना जेवण देऊन तृप्त करीत. त्यांना हाती झोळी धरण्याची आवश्यकता कशाला पडेल? पण भिक्षा मागण्याचे निमित्त करून संन्यासी लोकसंग्रह, लोकजागृती करीत सत्संगाचे लोण सामान्यजनांपर्यंत पोहोचवीत. संकटांचे निर्दालन करून सुखाचे ध्वज घरोघर उभारण्यासाठी भिक्षावलंबनाचा मार्ग पत्करून संसारी जनांचे रक्षण करीत, संकटमुक्त करीत. पण आजचे संन्यासी भिक्षाच मागतात फक्त, कुंडलिनी दीक्षा देणारे गुरुकृपापात्र नसतील तर भीक मागणारे भिकारी केवळ! वेषधारी संन्याशांना व त्यांच्या कोपाला व शापाला गुरुभक्ताने भिण्याचे कांही कारण नाही. यथाशक्ति आदर करून मार्गाला लावावे. गुरुभक्ताला असे बोकेसंन्यासी काही अपाय करू शकणार नाहीत. त्याचबरोबर गृहस्थालाही चारी आश्रम प्रपंचांत राहून कसे पुरे करता येतात तेही हा श्लोक दाखवून देत आहे. आपल्या पूर्वजांनी शतायुषी भव म्हणून शंभर वर्षांचे टाइमटेबल करून ठेवले आहे. पहिली पंचवीस वर्षे विद्यार्जन, मग पंचवीस वर्षे वैवाहिक जीवन, पुत्रप्राप्तीने पितृऋण फेडणें, नंतर पंचवीस वर्षे वानप्रस्थाश्रम म्हणजे घरीच राहूनही मनाने संसारातून निवृत होऊन शास्त्रांच्या अध्ययन-अध्यापनांत काळ कंठणे व अखेरची पंचवीस वर्षे संन्यासयोग म्हणजे संकल्पांचा न्यास. घरदार न सोडताही, प्रपंचांत राहूनही गुरुसेवकाला केवळ गुरुसेवेने चारी आश्रम पुरे करता येतात. गुरुसेवा म्हणजे गुरूच्या देहाची सेवा नव्हे, तर गुरुउपदेशानुसार साधना करणे ही गुरुसेवाच होय.

--श्रीगुरुगीतार्थेश्वरी (Marathi)
यत्रैव तिष्ठते सोऽपि, स देशः पुण्यभाजनम् । मुक्तस्य लक्षणं देवि, तवाग्रे कथितं मया ॥

Wherever he may dwell, that place becomes holy O Goddess! Thus I have described to you the characteristic of a liberated one. Shri Guru Geeta leads the one who follows Her honestly, to the Goal of Self-realization, helping him to climb the ladder of sadhana, giving him full description of seeker, sadhana and siddha. Shri Guru Geeta removes all the doubts from the seeker's mind by telling him the characteristics of the liberated one and the effects of self-realization. This stanza is summarizing all the characteristics of a Siddha, that have been so far described In short the dwelling place, abode of Siddha Purusha also equally is full of merit and does good to all. The realize perfect man makes any place where he lives, holy and sacred the place achieves the importance of Purusha-kshetra. So much influence he has over and about the place of his abode. Many miles around his abode, whoever happens to roar about, even his safety is assured, his life and property are protected because of the Siddha's power. It is said that ever if by mistake anybody unconsciously follows the path to Pandharpur, it amounts to meritorious act on his part, in the same way, all those who live near or round about the holy place where the liberated man resides, obtain merit automatically, without doing any deliberate efforts, and they too get liberated sooner or later. This stanza thus tells the greatness of the holy man's residence too. That is why the liberated one never dwells at one place for long, but roams about all over the world, and creates several holy places for people to get liberated. He travels a lot from time to time, from place to place. As the Sun shines from one place and throws his rays all over the world so also the liberated one remains at one place but the whole circumference becomes bright with his divine light and the darkness of ignorance is removed. The place becomes the abode of self. This is the characteristic of Guru-Tattva. This is the Tattva. This is the effect of it.

--Shri Gurugeetartheshwari



Official Site of Mahayogi Swami Umanand Saraswati © Shree Gurudev Dhyan Mandir Trust & Shree Kusumeshwari Prakashan    Site Designed By Raminde.in