स्वसुखाचा विचार मनांतहीं न येणाराच गुरुभक्त. गुरुची आज्ञाकांटेकोरपणे, स्वतःचे मत व मन बाजूला सारून पाळणे हीच गुरुसेवा. गुरुच्या मता प्रमाणे वागले कीं गुरुचें मन सांभाळले जातेच. स्वतःच्या मनाचे ओझे मनावर ठेवणारा गुरुकार्यात यशस्वी होत नाहीं गुरुवर भार घालून त्याच्या मार्गदर्शनाखालीच गुरुचें कार्य करावे.
-- श्री गुरुचरित्र बोधेश्वरी
Photo Archives
EnglishMarathi
आळंदित इंद्रायणी नदीच्या काठी प. पू. गुरुदेव, महिला साधक मुक्तानंद बाबांबरोबर आळंदित इंद्रायणी नदीच्या काठी बसले होते. गुरुभक्तीयोगांमध्ये शिष्या बरोबर त्याचे गुरु तिर्थयात्रा करत असतील तर ती महत्त्वाची साधना आहे. इंद्रायणी नदिच्या काठी महाराष्ट्राचे महान संत श्री ज्ञानेश्वर माऊलीची समाधी आहे त्यांनी केलेला भगवद्गीते वरचा मराठी अनुवाद भावार्थदीपिका किंवा ज्ञानेश्वरी हा सर्वश्रेष्ठ अध्यात्मिक ग्रंथ पुढे कधी होणे शक्य नाही. स्वामी मुक्तानंद परमहंस नेहमीच सांगतात की सिद्धयोगांवर ज्ञानेश्वरी उत्तम ग्रंथ आहे.
On the banks of river Indrayani at Alandi Gurudev Umananda relaxes on the banks of river Indrayani at Alandi along with her group of women as they accompanied Muktananda Baba to Alandi. Accompanying one's Guru on a pilgrimage is a very important sadhana for a student of Gurubhakti Yoga. The Samadhi of Jnaneshwar, one of the greatest saints of Maharashtra is built on the banks of of Indrayani. His commentary on the Bhagwad Gita known as Bhavartha Deepika or Jnaneshwari is one of the most important spiritual commentary ever to be written.Swami Muktananda Parmahansa always said that Jnaneshwari is the text book on Siddha Yoga.