Strong ego or insolent pride is due to ignorance of Guru. This ego asserts it self because it is ignorant about Him and the self.
-- souvenir, 1979
Subjectwise Jnaneshwari
विषयवार ज्ञानेश्वरी
Only EnglishOnly MarathiShow Both
⌄ PP Tai's Profound Contribution to Sri Jnaneshwari
Guru Om Subject-wise Jnaneshwari
PP Tai's Profound Contributionto Sri Jnaneshwari
For 20 consecutive years, PP Tai immersed herself in the study and lectures of Sri Jnaneshwari, a testament to her unwavering dedication. Siddhayogeshwari lectures are deeply rooted in the principles of Jnaneshwari. They demonstrate that the text is significant in the practice of Siddhayoga.
Inspiring Devotees to Embody the Teachings
Gurudev encouraged devotees to integrate Sri Jnaneshwari into their daily lives. Gurudev often emphasised the importance of reading and reflecting on the text. She suggested that sadhaks (spiritual seekers) read at least two verses from Sri Jnaneshwari before bed. That would allow them to contemplate on the principles and gradually experience their transformative power.
A Comprehensive Approach to Studying Jnaneshwari
PP Tai provided various guidelines for studying Jnaneshwari, including the subject-wise approach. Studying all the verses together on one topic completes the study of that theme, the concepts and the principles therein. This makes it easier to apply them to daily life.
⌄ Devilish Traits(Verse no. 213)
Jnandev says
Now follows the description of Devilish Estate. All comprehensive types of devilishness will be indicated. These traits are a warning and must be avoided and must be uprooted and weeded out from our bosom. Then the greater energy will flow out without any obstruction and a well-developed personality will be developed.
(213) The Demoniacal devilish Estate is a creeper plant full of miseries and thorns in the form of demerits, even then I must discourse on it in the course of discourses.
From Chapter 16 Sri Jnaneshwari as Understood by Swami Umanand
⌄ Devilish Traits(Verse no. 214 & 215)
214) A thing even though of no use and only fit to be abandoned must be known, in order to avoid and leave it. So even though full of evil and harmful, it is proper to hear about it attentively.
(215) This Asuri Sampatti, the Demonical Estate, is a veritable collection of dreadful demerits collected, lumped and summed together to constitute the great misery of life in hell.
From Chapter 16 Sri Jnaneshwari as Understood by Swami Umanand
⌄ Demoniacal Estate
(216) Or like all the poisons mixed and blended and
mingled together from what is known as the deadly
poison, it is the big assemblage of all sins brought
together and is named as the Demonical Estate.
(217) Of the demerits and vices of Devilish Estate, the
one that is most notorious for its influence and power is
*hypocrisy, Dambha*. This ostentation means pretending
to be righteous while living unrighteous way of life. It is
the cheapest available pose a vicious one can easily
assume. It is merely an artificial and superficial glow
and appearance of goodness, and purity, of religiosity
and sincerity. These are but attractive hoods to coverinner deadly motives and ugly intentions.
From Chapter 16 Sri Jnaneshwari as Understood by Swami Umanand
⌄ Devilish Traits verses 218,219,220
(218) Though one’s mother is as sacred as holy waters to him yet if she is criticised publicly or her faults and defects are told to others, she becomes the cause of taking one to hell.
(219) Guru’s teaching and preaching though lead to good results are not meant to be proclaimed at public places, otherwise it produces evil consequences. A certain type of sanctity must be maintained.
(220) Just as a boat rescues a drowning person caught
in a great flood and quickly carries him safe to the other
bank, but the same boat if it is fastened to his head,
drowns him also.
Chapter 16
Sri Jnaneshwari As Understood
Swami Umanand
⌄ Devilish Traits Verses 221,222
(221) Or it is like food which is though known as the means of sustenance and of subsistence of life, becomes poison if is taken in excess, just because it is good and palatable.
(222) Religion no doubt is like one’s friend helpful, but that does not mean it is to be used for tom toming and for blowing one’s own trumpet or for fooling others.For, then the same religion though by itself is protective becomes the cause of sin and brings blemishness.
Chapter 16
Sri Jnaneshwari As Understood
Swami Umanand
⌄ Devilish Traits Verses 223
(223) If the religious acts performed by one, are given wide publicity by means of copious and eloquent words, they become impious, and that is what is called hypocrisy. Now hear about arrogance called Darpa. A man of arrogance has endless pride of learning or of wealth or of social status, or of family connections. Arrogance gives the arrogant person a kind of insufferable uppishness. Arrogance is a misinterpreting and self-deluding medium. The result of living in a world of imagined self-importance is arrogance and that certainly drives away all inward peace. An arrogant person is a lonely creature, and gets exiled from the Kingdom of true love. He is always dreaming his own glories. His only companion is his own imagined selfimportance. He is highly self conceited, irritated and touchy,
Chapter 16 Sri Jnaneshwari As Understood Swami Umanand
⌄ Explanation of Devilish Traits
Verses 224, 225, 226
(224) A fool whose tongue has hardly learnt the very ABC of general education, treats with contempt the conference of persons knowing the Brahmic love.
(225) The horse of an expert horseman scoffs at the very Airavata, Indra’s elephant, or the chameleon over the thorny hedge considers the very Heaven as too low in height.
(226) Even if fire gets a fuel of grass, its flames reach the sky, or fish in a small pond looks down upon sea and does not consider much of it.
Chapter 16 Sri Jnaneshwari As Understood Swami Umanand
⌄ Explanation of Devilish Traits
Verses 227, 228, 229
(227) Or as poor one thinks himself very great if he possesses surplus food given by others as alms, that would suffice for one day, so an arrogant one gets intoxicated with the momentary possession of women, riches, education, praise and great honour.
(228) It is as if an unfortunate one should dismantle his own house just because there is a cool shade of clouds above or a fool should destroy a well of water after looking at and depending upon the water of a mirage.
(229) In short, to be stiff and to be overweened by the acquisition of riches is arrogance and nothing else.
Chapter 16 Sri Jnaneshwari As Understood Swami Umanand
⌄ Explanation of Devilish Traits
Verses 230, 231, 232
(230) Now hear about excessive Self-conceit. The world has got full faith in the Vedas and in this faith God is held in high reverence, and that God is the Sun who alone gives light to the entire Universe.
(231) The world aspires for the sovereignty over the entire universe. It also likes that it should not meet death.
(232) Then what wonder is there if the world with these motives begins to sing zealously the praises of God and worship Him? But even the hearing of such praise creates jealousy in one of the demoniacal tendencies and this feeling of jealousy goes on increasing.
Chapter 16 Sri Jnaneshwari As Understood Swami Umanand
⌄ Devilish Traits
Verses 233, 234, 235
(233) He says that he would swallow and digest God and poison the Vedas; he tries to annihilate His protection that people secure through laudation, praise and applaudation.
(234) The way the moth dislikes the lamp flame or a glow worm hates the Sun or the bird sparrow called Titavi bears enmity towards the sea.
(235) He does not tolerate to hear even the name of God through illusion and conceit. He considers Veda as Savat.
Chapter 16 Sri Jnaneshwari As Understood Swami Umanand
(236) Thus one with self-conceit and excessive selfpride should be known as the trodden royal road leading to Hell. Now hear about--anger. Such self-conceited, arrogant, hypocrite is bound to get angry with world around when he finds to be estimated totally different from his own estimate of himself. He revolts within, gets angry and shows wrath, Krodha at everything and everybody. He expresses his anger in his speech and action.
(237) Even if he just happens to see others enjoying happiness he gets saturated with the fiery poison of
anger.
(238) As adding a drop of water to boiling oil, makes the oil burst into flames or as the jackal suffers from heartburning at seeing the Moon,
(239) or the sinful owl loses its vision at the rise of the Sun, who in fact lights and delights the life of the whole world,
(240) or the morning time which is so very cool and refreshing to the ordinary world, is more painful than
death to a thief, or the milk is turned into subtle poison when is given to a serpent,
Chapter 16 Sri Jnaneshwari As Understood Swami Umanand
⌄ Devilish Traits
Verses 241, 242
(241) or the submarine fire in Sea called Vadavanal, gets more wild by drinking the sea-water and cools not at all.
(242) In all these ways, when one’s anger starts burning inwardly is greatly increased at seeing the
learning, good honour and prosperity and happiness of others and becomes wrath, Krodha.
Now hear about insolence or harshness, Parushya. Such individual who
is under the sway of anger and wrath is bound to be harsh in his behaviour.
From Chapter 16 Sri Jnaneshwari as Understood by Swami Umanand
⌄ Devilish Traits
Verses 243, 244, 245
(243) His mind is just like the hidden hole of serpents; his vision is piercing as sharp pointed arrows, his speech is fiery like a shower of live coals.
(244) While all his other actions are like a rugged saw possessing sharp teeth; in a word he has such harsh and fierce temperament,
(245) he is the most heinous of all human beings and harshness personified.
Chapter 16 Sri Jnaneshwari As Understood Swami Umanand
⌄ Signs of Ignorance
Verses 246, 247, 248, 249
Now hear the signs of Ignorance.
(246) Ignorance arises from one’s own self-delusions and ego-centric nature. Ignorant one knows not himself even; then naturally and consequently he fails to keep and maintain right relationship with the world around him. And this ignorance is the secret cause that forces and compels one to revolt against environments and act strangely and queerly. He is like a rock that knows no sense of touch such as hot and cold or like a person that is born blind knows no distinction between the day and the night.
(247) He is like the fire that when rages wild discriminates not what is worth to be consumed and what is otherwise, or he is like the Paris, the touch of which converts iron into gold, makes no distinction between iron and gold.
(248) He is like a ladle which although is immersed into dishes of diverse tastes, itself knows not their
different tastes,
(249) or as the wind when starts blowing, does not and cannot distinguish between a fine road or a crooked one, so he is blind and ignorant about right and wrong behaviour,
Chapter 16 Sri Jnaneshwari As Understood Swami Umanand
⌄ Signs of Ignorance
Verses 250, 251, 252
Now hear the signs of Ignorance.
(250) or he is like a child that puts into its mouth, anything it sees or lays its hands on, without knowing if
the thing is clean or unclean.
(251) Ignorance is thus, the state of the mind in which it cannot while consuming and experiencing life, taste the sweetness or the bitterness of the mixture of merits and sins.
(252) Such a state is undoubtedly called ignorance.
Thus I have explained to you the signs of all the six vices.
Chapter 16 Sri Jnaneshwari As Understood Swami Umanand
⌄ Signs of Ignorance
Verses 253, 254
Now hear the signs of Ignorance.
(253) Even though only six in number, they add great strength to the devilish mentality, as cobra has a small body, has very subtle poison in it, or a beautiful woman though lean and thin, possesses more power to attract and tempt sensuous persons,
(254) or as the three kinds of fire, the one at the time of world dissolution called Pralayagni, the thunderous lightning, named Vidyutagni and the fabulous submarine fire in Sea, Vadavagni, although less in number, would not find the whole universe enough even as a tiny morsel to satisfy their hunger when they get fully active.
Chapter 16 Sri Jnaneshwari As Understood Swami Umanand
⌄ परमपूज्य ताईंनी सातत्याने २० वर्षे ज्ञानेश्वरीवर प्रवचने दिली
परमपूज्य ताईंनी सातत्याने २० वर्षे ज्ञानेश्वरीवर प्रवचने दिली. त्यावर च आधारित सिद्धयोगेश्वरी ची ही प्रवचने आहेत. ज्ञानेश्वरी हा सिद्धयोगाचाच ग्रंथ आहे असे त्यांनी ह्या प्रवचनांमध्ये दाखवून पटवून सांगितले आहे.
साधकांनी एक ओवी तरी अनुभवावी असे त्यांना वाटे. त्याकरता सिद्धयोगाच्या साधकाने न चुकता झोपण्यापूर्वी म्हणजे त्या दिवस अखेरी पर्यंत तरी दररोज २ ओव्या वाचाव्यात असे त्यांचे म्हणणे होते.
ज्ञानेश्वरी अभ्यास करण्याचे त्यांनी अनेक प्रकार सांगितले आहेत. त्यातील च एक म्हणजे विषयवार ज्ञानेश्वरी चा अभ्यास.
⌄ असुरी संपत्ती (ओवी क्र.२१३)
ज्ञानदेव म्हणतात,
आता यापुढे आसुरी संपत्तीचे वर्णन केले आहे. सर्व प्रकारचा आसुरीपणा स्पष्ट केल्या जाईल. ही लक्षणे म्हणजे सावध राहण्याची सूचना असून त्यांना टाळले पाहिजे. मग कोणताही अडथळा न येता अधिक शक्ती बाहेर येईल, आणि सुयोग्य व्यक्तिमत्वाचा विकास होईल.
॥२१३॥ आसुरी संपत्ती दु:खरूपी बळकट वेली असून ती दुर्गुणरूपी काट्यांनी भरलेली आहे. तरीपण आपल्या संभाषणाच्या ओघात मी तिचे वर्णन करतो.
अध्याय १६ वा
सिद्ध ज्ञानेश्वरी
⌄ आसुरी संपत्ती चे वर्णन (ओवी क्र.२१४ आणि २१५)
॥२१४॥ जरी एखादी वस्तू निरुपयोगी असून टाकून देण्यास योग्य असली तरी पण ती टाकून देण्याकरताही तिची माहिती असणे आवश्यक आहे. म्हणून जरी आसुरी संपत्ती वाईट व दु:खदायक असली तरी ती लक्ष देऊन ऐकणे योग्य आहे.
॥२१५॥ जीवास नरकाची प्राप्ती करून देण्यास या अघोरी भयानक दोषांनी आसुरी संपत्तीच्या रूपाने एकजूट केली आहे. सारे दोष एकत्रित आले आहेत.
अध्याय १६ सिद्ध ज्ञानेश्वरी
⌄ आसुरी संपत्ती चे वर्णन (ओवी क्र.२१६ आणि २१७ )
॥२१६॥ किंवा सर्व प्रकारचे विष एकत्रित केले असता काळकूट विष तयार होते त्याप्रमाणे सर्व प्रकारच्या पापांचे, दोषांचे आसुरी संपत्ती हे मिश्रण आहे.
॥२१७॥ या आसुरी संपत्तीतील दोषात *मुख्य दोष म्हणून ज्याच्या मोठेपणाचा डंका आहे, मोठेपणाची प्रसिद्धी आहे, तो दोष म्हणजे दंभ, ढोंग होय*. दंभ म्हणजे अधार्मिक जीवन जगत असता धार्मिकतेचा आव आणणे होय. अशा प्रकारचे ढोंग कपटी मनुष्य सहजच करू शकतो. दंभ म्हणजे चांगुलपणा, शुद्धता, धार्मिकता, प्रामाणिकपणा यांचा कृत्रिम, वरवरचा देखावा होय. अंतःकरणातील घातकी व नीच उद्देश, हेतू झाकण्याचा हा बुरखा होय, आच्छादन होय.
अध्याय १६ सिद्ध ज्ञानेश्वरी
⌄ मनाची असुरी लक्षणे
ओवी २१८, २१९,२२०
॥२१८॥ एखाद्याने आपल्या आईची जर चारचौघांत, समाजात निंदा केली, किंवा तिचे दोष लोकांना उघड करून सांगितले तर ती जरी तीर्थाप्रमाणे पावन करणारी असली तरी त्याच्या पतनास, त्याला नरकात नेण्यास कारण होते.
॥२१९॥ जर गुरूने उपदेशिलेली ब्रह्मविद्या चव्हाट्यावर उघड केली तर ती जरी इष्ट फळ देणारी असली तरी ती शिष्याच्या अनिष्टाला, अहिताला कारण होते.
॥२२०॥ महापुरात बुडणाऱ्याला नाव वाचविते आणि पैलतीरावर पोहचविते असे असले तरी जर ती नावच डोक्यावर बांधली तर ती बुडविण्यास कारण ठरते.
अध्याय १६
सिद्ध ज्ञानेश्वरी
⌄ मनाची असुरी लक्षणे ओवी २२१,२२२
॥२२१॥ अन्न हे जीव राखण्यास कारण असते. परंतु जर ते चांगले रुचकर लागले म्हणून अतिप्रमाणात सेवन केले तर ते विषाप्रमाणे मारक होते.
॥२२२॥ दृष्टादृष्टाच्या संबंधात धर्म मित्राप्रमाणे सहायक असतो. परंतु याचा अर्थ असा नव्हे की त्याचा उपयोग आपला बडेजाव दाखविण्यासाठी, आपली फुशारकी मारण्यासाठी किवा दुसऱ्यांना मूर्ख बनविण्यासाठी करावा. कारण धर्म जरी तारक असला तरी अशा व्यवहारामुळे तो पापाला, दोषाला कारण होतो.
अध्याय १६ सिद्ध ज्ञानेश्वरी
⌄ मनाची असुरी लक्षणे ओवी २२३
॥२२३॥ जर स्वतःच केलेल्या धार्मिक कार्यांचा डांगोरा स्वतःच शब्दांच्या अवडंबराद्वारे पिटला तर ती कार्ये अधार्मिक, अपवित्र होतात आणि यालाच दंभ म्हणतात. *आता दर्पाची, ताठ्याची लक्षणे सांगतात*. आढ्यतेखोर मनुष्याला स्वत:च्या विद्वत्तेची, संपत्तीची, सामाजिक प्रतिष्ठेची, कौटुंबिक नातेसंबंधाची घमेंड असते. *आढ्यता मनुष्याला असहनशील करते*. ती विपर्यास करणारे व स्वतःचे स्वतःलाच भ्रमात पाडणारे माध्यम आहे. आत्मप्रौढीच्या अहं-महतीच्या काल्पनिक जगात वावरण्याचा ताठा, आढ्यता, दर्प हा परिणाम आहे. आणि त्यामुळे मनुष्याच्या आंतरिक शांतीचा भंग होतो. उद्धट मनुष्य एकाकी असतो. तो खऱ्या प्रेमापासून वंचित राहतो. असा मनुष्य स्वतःच्याच ऐश्वर्याचे, मोठेपणाचे स्वप्न पाहत असतो. त्याचा स्वकल्पित मोठेपणा हाच त्याचा सोबती असतो. तो अत्यंत गर्विष्ठ, चिडचिडा व नाजूक मनोवृत्तीचा असतो.
अध्याय १६ सिद्ध ज्ञानेश्वरी
⌄ आसुरी संपत्ती चे वर्णन
ओवी २२४, २२५, २२६
॥२२४॥ मूर्ख मनुष्य चार शब्द बोलायला लागला की ब्रह्मविद्या जाणणाऱ्याच्या सभेलाही तो तुच्छ लेखतो.
॥२२५॥ घोडे विकणाऱ्याचा घोडा इंद्राच्या ऐरावतालाही तुच्छ लेखतो किंवा काटेरी कुंपणावर बसलेल्या सरड्याला स्वर्गही ठेंगणा वाटतो.
॥२२६॥ अग्नीला गवत जरी जाळण्यास मिळाले तरी त्याच्या ज्वाळा आकाशाला जाऊन भिडतात. किंवा डबक्यात असणारा मासा सागराला कमी लेखतो आणि त्याचा विशेष विचारही करीत नाही.
अध्याय १६ सिद्ध ज्ञानेश्वरी
⌄ आसुरी संपत्ती चे वर्णन
ओवी २२७, २२८, २२९
॥२२७॥ दरिद्री मनुष्याला एखादे दिवशी जरी परान्न मिळाले तरी तो स्वतःला
खूप मोठा समजतो, उन्मत्त होतो त्याप्रमाणे आढ्यतेखोर मनुष्य धन, स्त्री, विद्या,
मानसन्मान व स्तुती यांनी उन्मत्त होतो.
॥२२८॥ त्याचे अशा प्रकारचे वागणे म्हणजे मेघांची छाया पाहून दुर्दैवी मनुष्याने
आपले घर मोडून पाडून टाकावे किंवा मृगजळावर विसंबून राहून मूर्ख मनुष्याने पाण्याची विहीर बुजवून टाकावी त्याप्रमाणे होय.
अध्याय १६ सिद्ध ज्ञानेश्वरी
⌄ आसुरी संपत्ती चे वर्णन
ओवी २३०, २३१, २३२
॥२३०॥ आता अभिमान म्हणजे काय ते ऐक. सर्व जगाचा वेदावर पूर्ण विश्वास आहे. या विश्वासानुसार ईश्वर सर्वश्रेष्ठ व पूज्य मानला जातो. आणि हा ईश्वर म्हणजे सर्व विश्वाला प्रकाश देणारा एकमेव सूर्यच होय.
॥२३१॥ सर्व जगाचे सार्वभौमपद मिळावे अशी सर्वांचीच आकांक्षा असते. त्याचप्रमाणे कधीही मरण येऊ नये असेच सर्वांना वाटते.
॥२३२॥ अशा प्रकारचे हेतू मनात ठेवून सर्व जग जर मोठ्या उत्साहाने ईश्वराचे स्तवन, पूजन व अर्चन करीत असले तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काय आहे? परंतु ईश्वराची स्तुती कानावर पडली की आसुरी प्रवृत्तीच्या मनुष्याला मत्सर वाटतो. आणि हा मत्सर वाढत्या प्रमाणात असतो.
अध्याय १६ सिद्ध ज्ञानेश्वरी
⌄ आसुरी संपत्ती चे वर्णन ओवी २३३, २३४, २३५
॥२३३॥ तो म्हणतो, मी देवाला खाऊन टाकीन. वेदांना विष घालीन. लोक स्तुती, स्तोत्र व प्रशंसा करून स्वतःकरिता जे संरक्षण मिळवितात त्याच संरक्षणाचा नाश करण्याचा तो प्रयत्न करतो.
॥२३४॥ पतंगाला दिव्याची ज्योत आवडत नाही. काजवा सूर्याचा द्वेष करतो किंवा टिटवी समुद्राशी वैर करते,
॥२३५॥ त्याप्रमाणे मोह, मद व गर्व यामुळे तो देवाचे नावही ऐकणे सहन करीत नाही. तो वेदांना आपली सवत मानतो.
अध्याय १६ सिद्ध ज्ञानेश्वरी
⌄ आसुरी संपत्ती चे वर्णन
ओवी २३६,२३७,२३८,२३९, २४०
॥२३६॥ याप्रमाणे आत्मप्रौढी हा अहंमन्य, गर्विष्ठ पुरुषांना रौरव नावाच्या नरकाकडे नेणारा, रूढ, रहदारीचा मार्गच समजावा. आता क्रोधासंबंधी सांगतात. त्याची स्वतःविषयी जी कल्पना असते त्याच्या उलट जर त्याला लोकांची त्याच्याबद्दल असलेली कल्पना आढळली तर अहंमन्य, उद्धट, ढोंगी, आत्मप्रौढी असलेला मनुष्य जगावर रागावतो. क्रुद्ध होतो. त्याचे मन आतल्या आत बंड करून उठते. तो सर्वांवर रागावतो. त्याच्या मनात सर्वांबद्दल क्रोध असतो. कर्म व वाचेद्वारा तो प्रगट करतो.
॥२३७॥ त्याने दुसऱ्याला सुखात पाहिले तरी त्याच्या मनात क्रोधाग्नीचे विष चढते.
॥२३८॥ उकळत्या तेलात पाण्याचा थेंब टाकला असता ज्याप्रमाणे तेलावर ज्वाळा उफाळून येतात किंवा ज्याप्रमाणे चंद्राला पाहून कोल्हा मनात जळफळतो,
॥२३९॥ वस्तुतः सूर्य सर्व विश्वाला प्रकाश देऊन त्यातील जनजीवन उजळून टाकतो. परंतु सूर्याचा उदय होताच पापी घुबडाचे डोळे फुटतात, त्याला दिसेनासे होते,
॥२४०॥ पहाट झाली की सर्व जगाला सुख व समाधान वाटते. परंतु चोराला ती मरणाहूनही त्रासदायक ठरते किंवा सापाला दूध पाजले असता त्याचे विष होते.
अध्याय १६ सिद्ध ज्ञानेश्वरी
⌄ आसुरी संपत्ती चे वर्णन
ओवी २४१, २४२
॥२४१॥ किंवा वडवानल जसजसा समुद्राचे पाणी पितो तसतसा तो शांत न होता अधिकाधिक प्रदीप्त होतो,
॥२४२॥ दुसऱ्याची विद्या, मानसन्मान, वैभव व सुख पाहून एखाद्याला जो संताप येतो त्याला क्रोध म्हणतात.
आता पारुष्य, कठोरपणाची लक्षणे देतात. क्रोधाच्या अधीन असलेला वागणुकीने कठोर, निर्दय असणारच.
अध्याय १६ सिद्ध ज्ञानेश्वरी
⌄ अज्ञानाची लक्षणे
ओवी २४३, २४४, २४५
आता अज्ञानाची लक्षणे ऐक.
॥२४३॥ त्याचे मन सर्पाच्या वारुळाप्रमाणे असते. त्याची दृष्टी बाणांच्या तीक्ष्ण अग्राप्रमाणे असते आणि त्याचे बोलणे जळत्या निखाऱ्याप्रमाणे प्रखर व दाहक असते.
॥२४४॥ त्याची अन्य कर्मे करवतीच्या दातांप्रमाणे तीक्ष्ण, त्रासदायक असतात. अशा प्रकारे त्याची मनोवृत्ती कठोर, निर्दय आणि भयानक असते.
॥२४५॥ तो सर्व मनुष्यप्राण्यांत अधम समजावा. असा मनुष्य पारुष्य, कठोरपणाची मूर्तीच होय.
अध्याय १६ सिद्ध ज्ञानेश्वरी
⌄ अज्ञानाची लक्षणे
ओवी २४६, २४७, २४८, २४९
आता अज्ञानाची लक्षणे ऐक.
॥२४६॥ भ्रमामुळे व आत्मकेंद्रित अहंभावामुळे अज्ञानाची उत्पत्ती होते. अज्ञानी माणसाला स्वतःला स्वतःची ओळख नसते. त्यामुळे स्वाभाविकच तो सभोवतालच्या जगाशी योग्य संबंध ठेवू शकत नाही. भोवतालच्या परिस्थितीविरुद्ध बंड करण्यास प्रवृत्त करणारे, भाग पाडणारे कारण म्हणजे अज्ञानच होय. हेच अज्ञान मनुष्याला विचित्र आचरण करावयास लावते. अज्ञानी मनुष्य थंड व उष्ण स्पर्श न कळणाऱ्या दगडाप्रमाणे किंवा दिवस व रात्र यांतील भेद न कळणाऱ्या जन्मांधाप्रमाणे असतो.
॥२४७॥ अग्नी एकदा भडकला की मग काय जाळणे योग्य व काय जाळणे अयोग्य याचा विवेक करीत नाही. किंवा परीस लोखंड व सोने यांतील फरक जाणत नाही त्याप्रमाणे अज्ञानी मनुष्याचे असते.
॥२४८॥ किंवा पळी निरनिराळ्या रुचीचे, रसाचे पदार्थ असलेल्या भांड्यात बुडविल्या जाते. परंतु ती त्या पदार्थाचे स्वाद जाणत नाही, त्याप्रमाणे अज्ञानी मनुष्य असतो.
॥२४९॥ किंवा वारा जेव्हा वाहू लागतो तेव्हा तो चांगला, सरळ वा वाकडा मार्ग यांत फरक करत नाही. त्याप्रमाणे काय करावे किंवा काय करू नये, काय योग्य आहे किंवा काय अयोग्य आहे याचा विवेक अज्ञानी मनुष्याला नसतो.
अध्याय १६ सिद्ध ज्ञानेश्वरी
⌄ अज्ञानाची लक्षणे
ओवी २५०, २५१, २५२
आता अज्ञानाची लक्षणे ऐक.
॥२५०॥ किंवा समोर जे दिसेल वा हाताला जे लागेल ते स्वच्छ आहे की अस्वच्छ हे न पाहता समोरची वस्तू उचलून तोंडात घालणाऱ्या लहानमुलाप्रमाणे अज्ञानी मनुष्य असतो.
॥२५१॥ जीवनात पाप व पुण्याचा कडू व गोड असा मिश्र अनुभव घेत असताना त्याबद्दल काहीच न वाटणे अशी जी दशा,
॥२५२॥ त्या दशेला अज्ञान म्हणतात. अशा प्रकारे मी तुला सहाही दोषांची लक्षणे सांगितली.
अध्याय १६ सिद्ध ज्ञानेश्वरी
⌄ अज्ञानाची लक्षणे
ओवी २५३, २५४
आता अज्ञानाची लक्षणे ऐक.
॥२५३॥ हे दोष संख्येने सहाच असले तरी त्यांच्यामुळे आसुरी वृत्ती प्रबल होते. सापाचे शरीर लहान असते. परंतु तो अत्यंत विषारी असतो. किंवा सुंदर तरुण स्त्री जरी कृश असली तरी कामुक पुरुषांना आकर्षित करण्याची तिची शक्ती अधिक असते.
॥२५४॥ किंवा प्रलयकाळीचा अग्नी, प्रलयाग्नी, समुद्रातील अग्नी, वडवाग्नी व विद्युदग्नी हे अग्नी संख्येने जरी तीनच असले तरी जेव्हा ते पूर्णपणे सक्रिय होतील तेव्हा सर्व विश्व त्यांच्या भुकेच्या एका घासालाही पुरणार नाही.
अध्याय १६ सिद्ध ज्ञानेश्वरी
⌄ अज्ञानाची लक्षणे
ओवी २५५, २५६
आता अज्ञानाची लक्षणे ऐक.
॥२५५॥ कफ, पित्त व वात या त्रिदोषांचा शरीरात जेव्हा प्रकोप होतो तेव्हा रोगी ब्रह्मदेवाला जरी शरण गेला, तरी त्याचे मरण चुकू शकत नाही. मग हे सहा दोष तर संख्येने त्रिदोषांच्या दुप्पट आहेत. हे जर मनावर स्वामित्व गाजवू लागले तर काय होईल ?
॥२५६॥ या सहा दोषांवर आसुरी संपत्तीची उभारणी झाली आहे. म्हणून ती कमी पडत नाही.