Photo Archives


English Marathi



सोलापूर येथे ध्यानयोग शिबिर
सोलापूर येथे ध्यानयोग शिबिर ठेवले असताना प.पू. गुरुदेवांनी त्यांच्या साधकांबरोबर अक्कलकोट तीर्थक्षेत्रास जाऊन श्री स्वामी समर्थ यांच्या समाधीला आदरांजली दिली. दत्त परंपरेतील एक परिपूर्ण गुरु श्री स्वामी समर्थ है अक्कलकोटला २२ वर्षे राहून त्यांनी तिथेच समाधी घेतली अक्कलकोट निवासी श्री गजानन महाराज प.पू. गुरुदेवांना भेटून फारच खूष झाले प. पू. गुरुदेवांना पाहिल्यावर त्यांनी सुंदर सुंदर अशी खूण केली एरव्ही कायम आशिर्वादासाठी सारखी मुद्रा असणारे त्यांचे हात प. पू. गुरुदेवांना पाहून सुंदर सुंदर अशाच खूणा करीत होते प. पू गुरुदेवांनी समाधीला हार, पुस्तके, शाल, नारळ अर्पण केले. श्री गजानन महाराजानी प. पू. गुरुदेवांना स्वतःच्या पूजेतील स्वामी समर्थांच्या फोटोला हार घालायला सांगितला श्री स्वामी समर्थांच्या समाधीची प. पू. गुरुदेवांनी पूजा केली व सुंदर छत्र समाधीवर अर्पण केले. तेथिल पूजार्यांनी स्वतः प. पू. गुरुदेवांना हार वाहीला व प्रसाद म्हणून दोन नारळ दिले. प.पू. गुरुदेवां बरोबर असणार्‍या साधकांसाठी हे एक उत्तंग दृश्य होते.

Meditation camp at Solapur
During a meditation camp at Solapur, Tai along with her group visited Akkalkot and paid their respects to the Samadhi of Swami Samartha, one of the most perfect master in the Datta tradition who lived for 22 years in Akkalkot and also took Samadhi there. Tai met Gajanan Maharaj of Akkalkot, a saint of the Datta tradition was very pleased to see Tai. and moved his hands in a manner to appreciate Tai's achievements. Tai offered books, garlands and shawl and coconuts to the Samadhi. Gajanan Maharaj asked Tai to garland the photo of Swami Samartha which he himself worshipped. Tai worshipped the Samadhi of Swami Samartha and offered an umbrella for the Samadhi. The priest there on his own put a big garland around Tai's neck and gave her two coconuts as gifts from God. This was a very lofty sight for all the devotees accompanying Tai.





Quick Links





Official Site of Mahayogi Swami Umanand Saraswati © Shree Gurudev Dhyan Mandir Trust & Shree Kusumeshwari Prakashan    Site Designed By Raminde.in